logo

मिशन ई सुरक्षा

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित करण्यासाठी आयोजित 'मिशन ई सुरक्षा' कार्यक्रम आज एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ यांच्या सहकार्याने मुंबई येथील एस.एन.डी.टी च्या दीक्षांत सभागृहात पार पडला.

यावेळी कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू रुबी ओझा, प्रभारी प्राचार्य जास्वंदी वांबुरकर, माझ्या आयोगाच्या सदस्या अॅड. गौरी छाब्रिया, सदस्य सचिव माया पाटोळे उपस्थित होत्या. मेटाच्या समन्वयक अश्विनी देसाई यांनी उपस्थित विद्यार्थीनींना सायबर सुरक्षित करणारे सादरीकरण केले.

महाविद्यालयीन मुलींशी बोलताना, वर्चुअल जगात जगताय पण आई वडिलांशी संवाद महत्त्वाचा असे सांगत माझ्यासमोर येणाऱ्या तरुण मुलींच्या केसची माहिती दिली. या मोरपंखी वयात जग जिंकायची तुमची इच्छा, आकांक्षा योग्यच आहे मात्र काळजी घ्या, प्रलोभनांना भुलू नका. आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी लढायचं, जगायचं आहे असे सांगत संवाद साधला.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा उज्वला चक्रदेव यांनी आपल्या भाषणात एस.एन.डी.टी चा गौरवशाली इतिहास सांगत मुलींना सक्षम, साक्षर करण्याच्या विद्यापीठाच्या कामाची माहिती दिली.

आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे यांनी आयोगाच्या कामाचे स्वरूप, मिशन

इ सुरक्षाच्या आयोजन मागची भूमिका, गरज विषद केली.

नागपूर नंतर मुंबईत मिशन इ सुरक्षा कार्यक्रम झाला असून येत्या काळात राज्यभरातील कॉलेजेस मध्ये कार्यक्रम आयोग आणि मेटा करणार आहे.

0
0 views